October 16, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१४) -- दिल चीज क्या है


दिल चीज क्या है...
(येथे ऐका)

खय्याम साहेबांनी बांधलेलं श्रीमंत, समृद्ध, सर्वार्थाने Rich म्हणता येईल असं हे मुजर्‍याचं गाणं!

सुरवातीला सारंगीच्या सुरासंगे येणारा आशाताईंचा थेट हृदयाला भिडणारा आलाप एका क्षणात सारी मैफल ताब्यात घेतो.

आशा भोसले! या बाईंचा आवाज किती सुरेख असावा, किती व्हर्सटाईल असावा याला काही सुमार? 'रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील..' असं अत्यंत सात्विकतेने, भक्तिभावाने गाणार्‍या आशाताई याच का? खरंच कमाल वाटते!

स्वच्छ निकोप आवाज, त्याचा लगाव आणि खानदानी बाज, सांभाळलेला मुजर्‍याचा लहेजा, ढंग, शब्दोच्चार, आलाप, हरकत, मधेच एखादी छोटेखानी दाणेदार तान, तार सप्तकात एखाद्या तळपत्या बिजलीगत पोहोचणारा आणि तेथील मध्यम-पंचम क्षणात उजळून टाकणारा आशाताईंचा तो दैवी स्वर! काय, कशी आणि किती दाद द्यावी आशाताईंना?!

सुंदर ठेके, त्याची लयीची वजनं, सारंगी-सतारीची सुंदर साथसंगत, जीवंतपणी दंतकथा बनलेल्या रेखा नावाच्या यक्षिणीचं दिसणं!

सगळंच लाजवाब!

--तात्या अभ्यंकर.

1 comment:

साधक said...

तात्या,
आम्हाल मिपाचा सदस्य होण्याची इच्छा आहे. दोनवेळा प्रयत्न केला आहे.
"निल्या" सदस्यनाम सक्रिय नाही अथवा प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. असा मेसेज येतो.
कृपया प्रतिक्रिया द्यावी. धन्यवाद.