June 12, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (८) -- दो हंसोका जोडा

स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३) -- मनमोहना बडे झुटे
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (४) -- मेरी सांसो को जो

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (५) -- केनू संग खेलू होली
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (६) -- अनाम वीरा
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (७) -- मथुरानगरपती काहे तुम.


'काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे'चे पहिले काही भाग उपक्रम या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. परंतु तिथे अधिक काही लिहावं अशी माझी लायकी नाही, म्हणून यापुढील सर्व भाग मी येथे प्रकाशित करणार आहे..!


दो हंसोका जोडा... (इथे ऐका)

सारंगीचे हृदयाला हात घालणारे सूर सुरू होतात आणि तिचा गळा भैरवीचे स्वर्गीय सूर गाऊ लागतो. सगळ्याच सुरांचं तिच्या गळ्याशी सख्य! नव्हे, गेली अनेक दशके हे सगळे सूर तिच्या गळ्यातच वस्तीला आहेत, तिच्या पुढ्यात हात जोडून उभे आहेत आणि त्यातला प्रत्येक सूर तिला विचारतो
आहे, "मेरे लायक कुछ सेवा?!"

तिचं नांव लता मंगेशकर!

मोरा सुखचैन भी, जीवन भी मोरा छीन लिया
पापी संसारने साजन भी मोरा छीन लिया!

वरील ओळीतील 'पापी संसारने साजनभी मोरा छीन लिया' म्हणताना 'साजन' शब्दावर जीवघेणी हरकत घेऊन त्यातील सूक्ष्म लयीला अत्यंत लीलया सांभाळत ती ज्या तर्हेने 'छीन' या शब्दावरील समेवर येते, तो संगीत क्षेत्रातला अद्भूत चमत्कार म्हटला पाहिजे!

रातकी आस गयी, दिनका सहाराभी गया
मोरा सूरजभी गया मोरा सितारा भी गया!

'मोरा सितारा भी गया' या शब्दांमधून भैरवीचं जे अगदी सहजसुंदर, नैसर्गिक रुपडं दिसतं त्याला तोड नाही!

अर्थपूर्ण शब्द, मन डोलायला लावणारा सुंदर ठेका, सारंगी-सतारीचा सुरेख वापर, सगळंच अप्रतीम! गजब, जुलम, रतिया बिताऊ, असूवन, मुशकील,डगरिया, उमरिया, इत्यादी शब्दांचे देहाती उच्चार केवळ दिदीनेच करावेत आणि केवळ तिनेच उभा करावा अवघ्या तीन मिनिटात भैरवीचा राजमहाल!

हे केवळ एक गाणं नव्हे! हा आहे जीवन समृद्ध करणारा आणि आयुष्यभर पुरणारा भैरवीचा अनमोल ठेवा! तुम्हाआम्हाला हा ठेवा भरभरून वाटणार्या त्या कवीला, नौशादमियांना, लतादिदीला आणि तबला-सारंगी-सतारीच्या त्या अज्ञात वादकांना सलाम..!

-- तात्या अभ्यंकर.


मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळाचे मुखपृष्ठ म्हणून आज हा लेख प्रसिद्ध झाला आहे!
‍‍

5 comments:

Anonymous said...

'दो हंसों का जोड़ा' या नौशादच्या (रटाळ) गाण्यातले वादक भले अज्ञात असतील, पण गीतलेखक अज्ञात नाहीत. त्यांची 'त्या कवीला' म्हणून बोळवण केलेली आहे. गीतकार अर्थातच शकील बदायुनी आहे. पण संगीतकार रवीचा दावा आहे की या गीताचा मुखडा त्यानी लिहिला होता. '(दो) हंसों का (इक) जोड़ा' मधे 'दो' हा अनावश्यक शब्द वापरल्याबद्दल काही लोकांनी टीका केली. यावर मजरूहचा तोडगा म्हणजे: 'कुछ दिन पहले, एक ताल में, कमलकुंज के अंदर, रहता था एक हंस का जोड़ा'. त्या गाण्याला एस डी बर्मननी उथळ चाल लावली. पण नौशादच्या निष्प्राण चालीपेक्षा ती बरी म्हणावी लागेल.

आशा जोगळेकर said...

Wa tatya, kevadh hrudya aahe he appreciation.

Tatyaa.. said...

>>पण नौशादच्या निष्प्राण चालीपेक्षा ती बरी म्हणावी लागेल.

हे आपलं व्यक्तिगत मत! असो.

परंतु आपण खर्‍या नावानिशी जर प्रतिसाद दिला असतात तर जास्त बरं झालं असतं! पडद्याआडून बाण मारण्यात काही अर्थ नाही! असो.

तात्या.

mannab said...

Dear Tatya,
I have come across your blog recently, but I just fell in love with it. Keep it up. I wish to read more and more from you. My senior friend Shri Yeshwant Karnik liked your post on one of the songs.With warm regards.
Mangesh Nabar

Anonymous said...

कुठल्याही गाण्याबद्दलचे कोणाचेही मत हे 'व्यक्तिगत मत' या प्रकारातच मोडते. एखाद्याने आपल्या मताखाली आपले नाव नोंदवले म्हणून ते जास्त बरोबर असा काही भाग नसतो, हे एक. आणि मी निनावी प्रशंसा केली असती तर तुम्ही 'पडद्याआडून केलेली प्रशंसा' असा शेरा बहुतेक मारला नसता, हे दुसरे. ते असो.

मी माझे मत उगीच गंमत म्हणून लिहिले. माझ्या टिप्पणीचा मुख्य उद्देश त्या शब्दरचनेशी संबंधित संदिग्धतेविषयी आणि गाण्याच्या इतिहासाविषयी लिहावे हा होता. 'एक हंस का जोड़ा' बरोबर की 'एक हंसों का जोड़ा' बरोबर? मी 'हंसों' शब्द पसंत करेन, पण मजरूह साहेबांनी 'एक हंस का जोड़ा' हा प्रयोग वापरला.